Ad will apear here
Next
पुण्यात एकता दौड उत्साहात

पुणे : सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पुणे विभागीय आयुक्त कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने गुरुवारी (३१ ऑक्टोबर) सकाळी ‘रन फॉर युनिटी’ अर्थात एकता दौड आयोजित करण्यात आली होती. विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर व जिल्हाधिकारी नवल किशोर राम यात सहभागी झाले होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरदार वल्लभभाई पटेल व  इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करुन त्यांना आदरांजली वाहण्यात आली. या वेळी जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान यांनी राष्ट्रीय एकता दिनानिमित्त उपस्थितांना ‘राष्ट्रीय एकता दिवस शपथ’ दिली. त्यानंतर काउन्सिल हॉल ते साधू वासवानी चौक-अलंकार चौक- पुन्हा काउन्सिल हॉल परिसर या मार्गाने एकता दौड पूर्ण झाली. या एकता दौडमध्ये पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव, उपायुक्त संजयसिंह चव्हाण, उपायुक्त चंद्रकांत गुडेवार, अपर जिल्हाधिकारी साहेबराव गायकवाड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी भारत शेंडगे, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय संतान, उपवनसंरक्षक नाईकडे, उपविभागीय अधिकारी संतोष देशमुख, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक यशवंत मानखेडकर, तहसीलदार अर्चना निकम यांच्यासह जिल्ह्यातील खेळाडू, क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, विद्यार्थी तसेच शासनाच्या विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. 
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/XZRLCF
Similar Posts
सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त एकता दौड पुणे : माजी उपपंतप्रधान सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त पद्मश्री डॉ. मणिभाई देसाई मानवसेवा ट्रस्टच्या वतीने गुरुवार, ३१ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडेचार वाजता एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे.
‘पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तत्‍काळ पंचनामे करावेत’ पुणे : पुणे जिल्ह्यात गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अतिवृष्टी व पूर यामुळे ग्रामीण भागामध्ये खरीप, बागायती, जिरायती, हंगामी पिके, तसेच फळबागांना मोठा फटका बसला असून, मोठया प्रमाणामध्ये शेती क्षेत्र बाधीत झाले आहे. शहरी भागामध्येही घरांचे नुकसान झाले आहे. याबाबतचे पंचनामे चार दिवसांत पूर्ण करण्याचे
डॉ. पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे जीवनगौरव पुरस्कार पुणे : सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सायरस पूनावाला यांना एशियन बिझनेस लीडरशिप फोरमतर्फे (एबीएलएफ) जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. दुबईत आयोजित एका समारंभात डॉ. पूनावाला यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी विजेती पुणे : अखिल मराठी बुद्धिबळ संघटनेच्या वतीने, पुणे जिल्हा बुद्धिबळ  संघटनेतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मानांकन खुला गट राज्य निवड चाचणी फिडे रेटिंग स्पर्धा नुकतीच पुण्यात पार पडली. या स्पर्धेत संपूर्ण राज्यातून २३३ खेळाडू सहभागी झाले होते. या स्पर्धेत औरंगाबादची ऋतुजा बक्षी प्रथम क्रमांकाची विजेती ठरली

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language